top of page

धगधगत्या अग्नीचा शेवट??

अजित

जावळे

कथा

सायंकाळी ६:०० ची वेळ. शिलॉंग येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधील सभागृह तुडूंब भरलेले. सर्व विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह भरलेला. वक्त्याचे मोलाचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी कान आतुरलेले. कारण वक्त्ये होते-भारताचे मिसाईल मॅन-डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम! धर्मनिरपेक्षतेचे मूर्तिमंत प्रतीक आणि अणुशक्ती व क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या अग्निपंखांना स्वदेशीचे बळ देणारे डॉ. कलाम! राष्ट्रपतिपदापासून ‘भारतरत्न’ च्या सन्मानापर्यंतची सारी लौकिक आभूषणे फिकी ठरवणाऱ्या या साध्या,सात्विक शास्त्रज्ञाने सत्य,निष्ठा आणि उत्कृष्टतेच्या ध्यासाचे संस्कार देशातील तीन पिढ्यांवर केले. मात्र सायंकाळी ६:३० वाजताच्या दरम्यान कार्यक्रमातच ते अचानक घेरी येऊन कोसळले. त्यांना लगेच नानग्रिम हिल्स येथील बेथनी रूग्णालयात हलविण्यात आले. परंतू तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

       ‘देशाला बलशाली होण्याची ज्यांनी दिशा दिली,त्या डॉ. कलाम यांनी देशाचे भविष्य असलेल्या आयआयएमच्या विद्यार्थांना दिशा देत असतानाच अंतिम श्वास घेतला.’ भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी मरणाल कवटाळले.

       भारत आणि महासत्ता? ऐकून आपल्यातले बरेचजण,मनात का होईना,हसले असतील! अरे, दुसऱ्याची महासत्ता वंशवत मिळाल्यासारखी स्विकारणारी आम्ही मंडळी, सहज कोणीतरी येतं आणि म्हणतं की, भारत २०२० साली महासत्ता होणार! आपण का ते मनावर घेणार आहोत?

       पण एवढा विचारवंत माणूस डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि ही खुळी कल्पना? जरा विचार केल्यावर वाटतं, की आपण खूप बाबतीत जगाच्या पुढे आहोतच की! भ्रष्टाचारात, स्वार्थी राजकारणात, भूकमारीत, शेतकऱ्यांच्या आत्महत्येत, गरीबीत आणि भारतीय विचारांच्या होणाऱ्या वस्त्रहरणाचे मूक साक्षीदार होण्यातही आपण पुढेच! आपल्यात एवढा स्वार्थीपणा का निर्माण झालाय? असा प्रश्न मला कधीकधी पडतो.

       भारतीय संस्कृती मला समजल्याप्रमाणे पूर्णपणे आधारित आहे, ती कृतज्ञतेचं नातं जपण्याचा प्रयत्न करण्यावर. आपल्या देशाला मातृ म्हणण्याची कृतज्ञता ही फक्त भारतपर्वातच आढळते. जगात अन्य कुठल्याही देशात हे आढळणार नाही, पण आपल्याला कधी जाणवलेच नाही, की या भारतमातेला सुद्धा आपली गरज आहे. महासत्ता म्हणजे नेमके काय अपेक्षित असावे कलामांना? आज आपण अमेरिकेला महासत्ता म्हणतो, ती फक्त तेथील संसाधनांच्या आणि आर्थिक संपन्नतेच्या जोरावर. हेच भारताकडून अपेक्षित असेल का? मुळीच नाही. या व्यतिरिक्त अपेक्षित आहे ती सांस्कृतिक संपन्नता आणि वैचारिक महानता.....जी जगाला अनुकरणीय असावी. भारत म्हणजे जगातील सर्वांत जुन्या आणि महान संस्कृतीवर आधारलेल्या तत्त्वांवर चालणारा देश. या संस्कृतीचे जतन आणि चिंतन जर आपण केले, तर कदाचित २०२० च्या आधीच हा देश महासत्तेच्या पदवीने सन्मानित होईल.

       आज आपली युवा पिढी शिक्षण घेऊन आर्थिक दृष्टीने संपन्न असलेल्या राष्ट्रांकडे वळत आहे. हे सगळे थांबले पाहिजे. आजच्या पिढीला हे जाणवले पाहिजे, की महासत्ता भारताकडे आणणे हे त्यांचे कर्तव्य आहे. भारतभूमीवर प्रेम करा. कारण ती तुमच्यावर अफाट प्रेम करते. फक्त २०-२० वर्ल्डकप जिंकण्याने भारताचा मान वाढणार नाही. सुरूवात आपण केली पाहिजे. आपला आपल्या देशाला कोणत्या पद्धतीने उपयोग होईल हा विचार केला पाहिजे.

सर्वकाही देता यावे, श्रेय राहू नये हाती|

यावी लावता कपाळी, भक्तीभावाने ही माती......

       पण हे काही सोपे नाही. मुळापासून आपल्या विचारधारणेत बदल झाला पाहिजे.आज ‘नासा’ सारख्या विदेशी संस्थेत ३८% भारतीय आहेत. अभिमान वाटावी अशी ही गोष्ट आहे. भारतीय वंशाचे सुंदर पिचाई आज मायक्रोसॉफ्ट या बलाढ्य कंपनीचे सर्वेसर्वा आहेत. म्हणजेच भारतीयांकडे नेतृत्त्व कौशल्य आहे. म्हणूनच या कौशल्याचा उपयोग देशासाठी करूयात.

       कलामांनी पाहिलेले स्वप्न हे कोणा एकाचे नसून सर्वांचे समजूयात. हा देश कोण्या एकाचा नसून आपला आहे ही भावना जागृत करूयात. जगूयात देशासाठी, सर्वांसाठी आणि सरतेशेवटी स्वत:साठी!

धगधगणारा हा अग्नी

असाच तेवत ठेवू |

कलामांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी

सगळे मिळूनी प्रयत्न करूयात ||

देणे

शेखर

दरेकर

2

स्वप्नं....

प्रज्वल

पुंडे

3

स्वप्न....

प्रत्येकाच एक तरी स्वप्न असतं....

कोणाचं चांगल्या घराचं....तर कोणाचं गाडीचं....

कोणाचं चांगल्या नोकरीचं....तर कोणाचं छोकरीचं....

रात्री झोपल्यानंतर पडतं त्याला स्वप्न म्हणावं का ???

                   नाही....माझ्यामते नाही....स्वप्न हे डोळे उघडे ठेवून पाहिलेले असावे....मुळात त्या स्वप्नामुळे आपल्याला झोपच लागू नये....दिवसरात्र आपल्या डोक्यात त्याचाच विचार असायला हवा....नेहमी मोठ्ठं स्वप्न पहावं....स्वप्न पाहायला थोडीच पैसे पडतात....पण नुसते स्वप्न पाहूनही काही उपयोग नाही....ते साकार करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते....असेल नशिबात तर होईल असे तर म्हणूच नये....कारण....”नशिबदेखील त्याचीच साथ देतं जे त्याच्यावर अवलंबून नसतात....”

                   आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचेपर्यंत हजारो अडचणी येतील....पण थांबायच नाही....कारण....

“अशक्य काही नाही,

निराशेने खचू नका....

वैफल्याने मोडून पडू नका,

यश तुमच्या पायाशी येईल....!!!”

आणि हे सगळं करून तुमचं स्वप्न साकार झालच तर....

“Don’t raise your STANDARD OF LIVING….

Raise your STANDARD OF GIVING….”

कारण तुमचं सध्याच जीवनदेखील हजारो लोकांच स्वप्न असू शकत....”

© 2016 by CWIT, Pune.
 
  • w-facebook
  • w-googleplus
  • White YouTube Icon

CONNECT​ WITH US:​​

SUBSCRIBE:​​

19, Bund Garden Road,

Pune 411001

wadiacusrow@gmail.com

OPENING HOURS

All staff members are in the office and available most weekdays.

MONDAY - FRIDAY

09:00 AM - 06:30 PM

ADDRESS

TEL

020-26164814
020-2616131061310

FAX

Subscribe for Updates

Congrats! You're subscribed.

bottom of page